एमएससीडीएचा महाराष्ट्रामध्ये तंत्रज्ञान भागिदार म्हणून ‘मेडिप्ता सोल्युशन्स’ बरोबर सहकार्य करार

एमएससीडीएचा महाराष्ट्रामध्ये तंत्रज्ञान भागिदार म्हणून 
‘मेडिप्ता सोल्युशन्स’ बरोबर सहकार्य करार


महाराष्ट्र राज्य केमिस्टस आणि ड्रगिस्टस असोशिएशन (एमएससीडीए) आणि ‘मेडिप्ता सोल्युशन्स’ या वैद्यकीय सेवा पुरवठादार संस्थेने आज शहरात सहकार्य करार करत असल्याचे जाहीर केले आहे. एमएससीडीए ही फार्मास्युतीकल क्षेत्राच्या विकासाचा प्रसार करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असते. ‘मेडिप्ता’ हे भारतातील एक नाविन्यपूर्ण असे अॅप असून त्या माध्यमातून रुग्ण, डॉक्टर, निदान करणाऱ्या प्रयोगशाळा आणि केमिस्टस तसेच आरोग्यनिगा क्षेत्रातील प्रत्येक घटक जोडला जाणार आहे.



राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री श्री मदन येरावार यांनी मुंबईत अधिकृतपणे ‘मेडिप्ता’चा शुभारंभ केला. एमएससीडीएचे अध्यक्ष श्री जगन्नाध शिंदे यावेळी उपस्थित होते. मेडिप्ता हा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व केमिस्टस आणि ड्रगिस्टस साठी तंत्रज्ञान भागीदार असेल असे त्यांनी जाहीर केले. पत्रकारांशी बोल्तानन ते म्हणाले, “एमएससीडीएचे मूळ उद्दिष्ट हे संपूर्ण फार्मा घटकांना संघटीत करणे हे असून त्यातून वस्तू फुकट जाण्याच्या प्रमाणावर आळा बसेल आणि ऊलाढालीचा खर्च कमी होईल तसेच खेळते भांडवल वाढेल.‘मेडिप्ता’च्या संलग्नतेच्या माध्यमातून सर्व केमिस्टस आणि ड्रगिस्टस हे एकत्रितपणे काम करतील आणि त्यातून सध्याची फार्मसीची किरकोळ व्यापार साखळी अधिक घट्ट होईल. ‘मेडिप्ता’च्या माध्यमातून या क्षेत्रातील लोकांशी जोडले जाण्याची संधी प्राप्त होईल आणि या साखळीला व्यवसायवृद्धी करण्यास वाव मिळेल. ऑनलाइन ड्रग सप्लाय ही सर्व किरकोळ व्यापारी, वितरक आणि संलग्न वैद्यकीय सेवांसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे. ‘मेडिप्ता’च्या माध्यमातून सर्व किरकोळ व्यापाऱ्यांना रुग्णांपर्यंत केवळ २० मिनिटांत पोहोचण्याची संधी प्राप्त होईल. डिजिटल प्रिस्क्रिप्शन आणि वितरण व्यवस्थापन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे साध्य होणार आहे,” असेही ते म्हणाले.

या सहकार्याच्या माध्यमातून वितरक हे केमिस्टसच्या गरजेप्रमाणे त्यांना वितरण करू शकतील आणि त्याचवेळी केमिस्टस आणि फार्मासिस्टस सुद्धा रुग्ण, डॉक्टरना तत्काळ पुरवठा करू शकतील. त्याशिवाय डॉक्टरांनी दिलेल्या चीठीचा संदर्भ स्वतःकडे साठवून ठेवू शकतील. केमिस्टस आणि ड्रगिस्टसना या अॅपच्या माध्यमातून किती साठा कोणत्या प्रमाणात आहे, याची माहिती मिळेल. जर रुग्नांना वेळेत औषधाचे वितरण झाले नाही, तर त्याची माहिती केमिस्टसना तत्काळ मिळू शकेल आणि तशी आठवण करून दिली जाईल. या एका अॅपमध्ये १६ एन्ट्री असतील आणि त्यांत १५० वैशिष्ट्ये असतील. हे केवळ १५ एमबीच्या मर्यादेत असून त्यातून ‘मेडिप्ता’ हे एक अनोखे असे अॅप ठरते.

  
‘मेडिप्ता’चे इतर फायदे पुढीलप्रमणे आहेत –
  
·         रुग्णाला कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय मार्गदर्शन किंवा उपचार मिळू शकतात. त्यांत औषधांची आठवण करून देण्यापासून गरोदरपणातील अॅप पर्यंतचा समावेश आहे.  
·         डॉक्टर/रुग्णालय/ दवाखाने यांना रुग्णाची माहिती यातून मिळेल आणि त्यातून त्यांना योग्य ते मार्गदर्शन देता येईल.
·         चाचणी प्रयोगशाळा म्हणजे लॅब/रेडीओलॉजीस्ट/निदान केंद्र प्रयोगशाळेतील निदान आणि निदान सुविधा रुग्णांना यातून प्राप्त होऊ शकतात. त्याशिवाय लॅबमधील अहवाल ऑनलाईन टाकले जावू शकतात.
·         लॅबोरेटरी, रक्तपेढ्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, अँबूलन्स आणि विमा यांसारख्या संलग्न सेवाही या व्यासपीठावर उपलब्ध होवू शकतात.

‘मेडिप्ता सोल्युशन्स’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल बोजलवार म्हणाले, मेडिप्ता सोल्युशन्स हे एक आरोग्यनिगा केंद्र असून त्यात कोणीही इ-आरोग्य सेवांमध्ये येऊ शकते. हे भारतातील एकमेव असे अॅप आहे की जे सर्व संबंधित घटकांना एकाच व्यासपीठावर आणते. आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी या अॅपच्या माध्यमातून आरोग्यतज्ञांशी जोडले जाण्याची संधी प्राप्त होते. एक परिपूर्ण आणि सर्वसमावेशक असे आरोग्यनिगा व्यासपीठ सादर करून आम्ही आरोग्यनिगेमध्ये एक नवीन अध्याय दाखल करत आहोत. या अॅपचा एक महत्वाचा भाग म्हणजे हे अॅप रूग, डॉक्टर, अॅम्बुलंस आणि रक्तपेढ्या यांच्यासाठी विनामुल्य आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24